मूळव्याध(Piles)

पाइल्स (Piles) हा एक सर्वसामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ(anus) असलेला कोंब. मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला आतील मूळव्याध जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाहेरील मूळव्याध जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो. मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या म्हणजेच मूळव्याधीचा कोंब(Hemorrhoids sprout) असतो. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास कमी असतो आणि रुग्णाला काही लक्षणे जाणवत नाहीत.

मुळव्याधाची लक्षणे जाणवत असल्यास बहुतेकदा ती खालील स्वरूपाची असतात(If the symptoms of Piles disease are felt, they are usually of the following form in Marathi) –

शौचानंतर रक्तस्त्राव – हे रक्त लाल रंगाचे असते.

गुदद्वाराजवळ खाज गुदद्वाराजवळ कोंब बाहेर येणे – हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो.

मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर लावून करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात Fiber पदार्थांची कमतरता असल्यामुळे Constipation होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो.

मूळव्याध होण्याचा धोका बऱ्याच कारणांमुळे वाढू शकतो(A number of factors can increase the risk of Piles In Marathi)

मूळव्याधीची लक्षणे पाहिल्यास वेदनारहित रक्तस्त्राव, गुदद्वारात खाज आणि वेदना, गुद्द्वारात जळजळ किंवा वा सूज येणे किंवा मलविसर्जन करताना जास्त जोर लावल्याने हा त्रास उद्भवतो. तसेच जन्मजात कमकुवत धमन्या, जुनाट बद्धकोष्ठता, जुनाट खोकला किंवा जड वस्तू उचलणे हे मूळव्याधीचे लक्षण आहे. मूळव्याध अनेकदा काही आठवड्यांत बरा होतो. सुदैवाने, मूळव्याधसाठी होमिओपॅथी उपाय आहे.

मूळव्याध होण्याची कारणे(Causes of piles in marathi):

मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होऊ शकतो. मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे सुद्धा होऊ शकतो. आहारात Fiber पदार्थांची कमतरता असल्यामुळे Constipation होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध होण्याची काही खालील कारणे –

  • वाढलेले वजन
  • ४५ वर्षांपेक्षा जास्त वय
  • गर्भावस्था
  • अनुवांशिकता

मूळव्याधीची लक्षणे बऱ्याच वेळा उपचाराशिवायही काही दिवसात बरी होतात. गर्भावस्थेदरम्यान झालेली मूळव्याध(Piles) बाळाच्या जन्म दिल्या नंतर बरा होऊ शकतो. परंतु गुदद्वाराच्या अंतर्गत भागात असण्याऱ्या रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी जीवनशैलीत खालील बदल करणे आवश्यक आहे –

  • आहारातील Fiber पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवणे – फळे,हिरवी पालेभाज्या, कोशिंबिरी, कडधान्ये, सुकामेवा इ. पदार्थ Fiber पदार्थांचे स्रोत आहेत.
  • भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, भरपूर पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन करू नये. मद्यपान टाळावे.
  • शौचाची भावना झाल्यानंतर शौचास जाण्यास उशीर करायला नाही पाहिजे. असे केल्यामुळे शौच कठीण आणि कोरडे होते त्यामुळे शौचास जोर करावा लागू शकतो.
  • काही औषधांमुळे (उदा: कोडीन वेदनाशामक औषधे) Constipation होतो. अशी औषधे घेणे शक्यतो टाळावे.
  • वजन नियंत्रणात असायला पाहिजे.
  • नियमित व्यायाम– यामुळे Constipation टाळण्यास मदत होते, रक्तदाब कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

या बदलांमुळे मूळव्याध होण्याचा किंवा पुन्हापुन्हा होण्याचा धोका कमी असतो. आपल्या डॉक्टरांनी सांगितलेले औषध गुदद्वाराजवळ आणि आत लावल्यास आपल्या लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते तसेच शौच करणे सुलभ होते. .

जर आपली मूळव्याधीची लक्षणे जास्त गंभीर असतील तर त्यावरील उपचारांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहे

मूळव्याधीची मुख्य लक्षणे(Main symptoms of piles in marathi):

main reasons of pilesबहुतेक वेळा मूळव्याधीची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि उपचाराशिवाय काही दिवसात बरी होऊ शकतात. काही लोकांना लक्षणे न जाणवल्यामुळे मूळव्याधीचा त्रास आहे हे देखील रुग्ण समजू शकत नाही.

परंतु जेव्हा त्रास होतो त्यावेळी खालील लक्षणे जाणवतात –

  • शौचानंतर रक्तस्त्राव होणे. हे रक्त लालभडक रंगाचे असते.
  • गुदद्वाराजवळ खाज
  • गुदद्वाराजवळ कोंब बाहेर आल्यनंतर हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो
  • शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे
  • गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूजने.

मूळव्याधीला रक्तपुरवठा कमी पडल्यास किंवा थांबल्यास मूळव्याध दुखत नाही.

मूळव्याध होण्याची कारणे(Causes of piles in marathi):

मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की  हा त्रास होतो असे दिसून येते. दाब वाढल्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात व सुजतात.

मूळव्याध होण्याचा धोका काही कारणांमुळे वाढू शकतो –

  • अतिरिक्त वजन किंवा स्थूलपणा
  • आहारामध्ये Fiber पदार्थांचा अभाव व त्यामुळे सतत बद्धकोष्ठ असणे.
  • दीर्घकालीन जुलाब
  • सतत जड वस्तू उचलणे
  • सतत खोकला किंवा वारंवार उलट्या
  • बैठी जीवनशैली
  • गर्भावस्थामध्ये बाळाच्या जन्मानंतर बरेचदा रक्तस्त्राव थांबतो.
  • ४५ वर्षापेक्षा जास्त वय असणे. जसे जसे वय वाढत जाते तस तसे शरीराचे स्नायू, रक्तवाहिन्या व आधार देणारे इतर अनेक घटक कमकुवत होत जातात आणि मूळव्याध होण्याचा धोका जास्त उद्भवू शकतो. .
  • अनुवंशिकता

मूळव्याधीचे निदान(Diagnosis of piles in marathi):

आपल्या गुदाशयाची तपासणी करून डॉक्टर मूळव्याधीचे निदान करतात.

गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी:

प्रथम डॉक्टर आपल्या गुदद्वाराच्या बाह्य बाजूस काही मूळव्याधीचे कोंब आहेत हे तपासतात. त्यानंतर अंतर्गत बाजू तपासली जाते. या तपासणीला DRE (Digital Rectal Examination) असे म्हणतात.

प्रोक्टोस्कोपी:

काही वेळा प्रोक्टोस्कोप वापरुन पुढील अंतर्गत तपासणी करणे आवश्यक असते. प्रोक्टोस्कोप ही एक पोकळ नळी असते. प्रोक्टोस्कोप रुग्णाच्या शौचाच्या जागेतून आत शिरवाला जातो त्यामुळे आतील भागाची तपासणी करता येऊ शकते.

कोलोनोस्कोपी:

काही वेळा कर्करोग किंवा मोठ्या आतड्याचा इतर काही त्रास नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टर आपल्याला कोलोनोस्कोपी किंवा एन्डोस्कोपीचा सल्ला देतात.

मूळव्याधीचे प्रकार:गुदाशयाची तपासणी किंवा प्रोक्टोस्कोपीनंतर डॉक्टर रुग्णाला कोणत्या प्रकारचा मूळव्याध आहे सांगू शकतात.

  • दुसरी पायरी – गुदद्वाराच्या अंतर्गत भागात आलेली थोडी मोठी सूज / कोंब. शौचाच्या वेळी ही सूज बाहेर येते.
  • तिसरी पायरी – एक किंवा अधिक लहान गाठी गुदद्वारातून बाहेर लटकलेल्या असणे. या गाठी पुन्हा आत ढकलता येतात.
  • चौथी पायरी – एक किंवा अधिक थोड्या मोठ्या गाठी गुदद्वारातून बाहेर लटकलेल्या असणे. या गाठी पुन्हा आत ढकलता येत नाहीत.

मूळव्याधीचा प्रकार समजून घेणे हे सर्वोत्तम उपचारासाठी आवश्यक आहे.

मूळव्याधीवरील उपचार(Piles treatment in marathi):

मूळव्याधीचा त्रास बरेचदा कोणत्याही उपचाराशिवाय काही दिवसात बरा होऊ शकतो. गुदद्वाराजवळील खाज आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी अनेक उपचार उपलब्ध आहेत.

सर्वप्रथम आहारातील बदल आणि शौचाच्या वेळी जोर न लावणे हे सांगितले जाते.

आहारातील बदल व स्वतः घ्यायची काळजी –

  • पहिली पायरी – गुदद्वाराच्या आतील बाजूस लहान सूज / कोंब येणे. ही सूज बाहेरून दिसत नाही.
  • दुसरी पायरी – गुदद्वाराच्या आतील बाजूस मोठी सूज \ कोंब येणे. शौचाच्या वेळी ही सूज बाहेर येते.
  • तिसरी पायरी – गुदद्वारातून बाहेर एक किंवा अधिक लहान गाठी लटकलेल्या असणे. या गाठी पुन्हा आत ढकलता येतात.
  • चौथी पायरी – गुदद्वारातून बाहेर एक किंवा अधिक मोठ्या गाठी लटकलेल्या असणे. या गाठी पुन्हा आत ढकलता येत नाही.

मूळव्याधीचा प्रकार समजून घेणे हे सर्वोत्तम उपचारासाठी आवश्यक घटक आहे.

आहारातील बदल व स्वतः घ्यायची काळजी –

आपल्याला होणारा मूळव्याधीचा त्रास बद्धकोष्ठामुळे असेल तर शौच नियमित व सुलभ होणे आवश्यक आहे. अशे केल्यास शौचाच्या वेळी जोर करावा लागणार नाही.

  • यासाठी आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवावे – फळे, कोशिंबिरी, पालेभाज्या, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत.
  • भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन टाळावे. मद्यपान टाळावे.

शौचाच्या वेळी खालील काळजी घ्यावी –

  • शौचाच्या वेळी कुंथू नये किंवा जोर करु नये.
  • शौचानंतर मऊ toilet paper वापरावा.
  • शौचानंतरची स्वच्छता हळुवारपणे करावी.

लेझर उपचार(laser treatment in marathi)

मूळव्याध साठी लेझर उपचार काय आहे(What is laser treatment for Piles)?

lazer treatment on pilesमूळव्याध साठी लेझर उपचार कमी हल्ल्याचा आहे. बाधित क्षेत्रात कोणतीही कापणी होत नाही. प्रभावित भागावर लेझर ऊर्जेचा अचूक रीतीने उपचार होऊ शकतो आणि ही समस्या त्वरित सोडविली जाते. शस्त्रक्रियेनंतर रूग्ण त्वरित आपले सामान्य दिनचर्या सुरू करू शकतात. डॉ. अभिजीत गोटखिंडे पुणेमधील मूळव्याधासाठी नवीनतम लेझर उपचार देतात. अल्ट्रा केयर हॉस्पिटलमध्ये मूळव्याधासाठी जगातील सर्वाधिक प्रगत डायोड लेसरची सर्वाधिक आवृत्ती आहे.

उपचारांवर चर्चा करण्यापूर्वी, आपल्याला जे माहित असणे आवश्यक आहे ते पुढे बघूया.

मूळव्याधावर उपचार करण्याची पारंपारिक पद्धत(A traditional method of treating piles in marathi)

सामान्यत: शस्त्रक्रियेच्या पारंपारिक पद्धतीमध्ये प्रभावित भागात कापणी केली जाते. दीर्घकाळ पुनर्प्राप्ती, एकाधिक ड्रेसिंग्ज, क्लिनिकला भेट देणे आणि पुनरावृत्ती होण्याचा धोका असू शकते. या सर्व गोष्टींचा विचारात घेऊन मूळव्याधासाठी लेझर ट्रीटमेंट करणे ही सर्वोत्तम निवड मानली जाते.

मूळव्याधावर लेसर उपचार कसे कार्य करतात(How does laser treatment work on Piles in marathi)?

गुद्द्वार प्रवेश स्थळा द्वारे लेसर बीम जातो आणि लेसर ऊर्जा हेमोर्रोइडल वस्तुमानावर लागू होते. लेसर उर्जेचे नियंत्रित उत्सर्जन सबमुकोसा झोनपर्यंत पोहोचते, ज्यामुळे हेमोर्रोडायडल वस्तुमान संकुचित होते. फायब्रोसिस पुनर्रचना नवीन संयोजी ऊतक निर्माण करते, ज्यामुळे mucous त्वचा प्रॉलेप्सीची पुनरावृत्ती होण्यापासून प्रतिबंधित मूलभूत ऊतकांचे पालन करते.

मूळव्याध वर लेसर उपचारांचे काय फायदे आहेत(What are the benefits of laser treatment on Piles in marathi)?

वेगवान उपचार, कमी वेदना, उच्च परिणाम आणि लहान प्रक्रिया.

इष्टतम उपचार आणि निकाल(Optimal treatment and results in marathi).

वापर सुलभ शस्त्रक्रिया नियंत्रण आणि अचूक डोस सक्षम करण्याच्या प्रीसेट्स, त्यासाठी चीर फाड आणि स्टरिंगची आवश्यकता नाही.

औषधोपचार:

  • Corticosteroid cream- आपल्या गुदद्वाराच्या आत आणि त्याभोवती खूप सूज असेल तर डॉक्टर आपल्याला तिथे लावण्यासाठी स्टेरॉईड उपलब्ध असलेले मलम देऊ शकतात. वेदनाशामक औषधे
  • Paracetamol- सारखी नेहमी वापरली जाणारी वेदनाशामक औषधे मूळव्याधीचे दुखणे पण कमी करू शकतात. परंतु कोडीन (Codein) असलेल्या औषधांमुळे कॉन्स्टिपेशन होते त्यामुळे ही औषधे वापरू नयेत. खूप दुखणाऱ्या मूळव्याधीसाठी डॉक्टर ती जागा तात्पुरती बधीर करणारी मलमे लावायला सांगू शकतात. बद्धकोष्ठ असेल तर डॉक्टर रेचक (या औषधांमुळे पोट साफ व्हायला मदत होते) देऊ शकतात.

शस्त्रक्रियेविना उपचार(Treatment without surgery in marathi)

  • आहारात बदल करून व औषधोपचार करूनदेखील मूळव्याधीच्या त्रासात जर काही फरक न पडल्यास आपले डॉक्टर बँडिंग किंवा स्क्लेरोथेरपीसारखे शस्त्रक्रियेविना असलेले उपचार करण्याचा सल्ला देतात.
  • बँडिंग: या प्रक्रियेमध्ये मूळव्याधीच्या मुळाशी बँड लावून कोंबाचा रक्तप्रवाह बंद केला जातो. यामुळे काही दिवसांत कोंब गळून पडतो.
  • इंजेक्शन (स्क्लेरोथेरपी): बँडिंगला पर्याय म्हणून स्क्लेरोथेरपी ही उपचारपद्धती देखील वापरली जाऊ शकते. या प्रक्रियेमध्ये गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमध्ये एक रसायन सोडले जाते. यामुळे इंजेक्शन दिलेल्या जागेजवळील मज्जातंतू बधीर होतात आणि दुखणे कमी होते. मूळव्याधीचा कोंब कठीण होऊन तिथे व्रण तयार होतो. साधारणपणे ४ ते ६ आठवड्यात कोंबाचा आकार कमी होऊ शकतो.

मूळव्याधीची शस्त्रक्रिया(Piles Surgery in marathi):

इतर कोणत्याही उपचारांनी फरक पडत नसेल किंवा रुग्णाच्या मूळव्याधीचा प्रकार इतर उपचारांसाठी योग्य नसेल तर डॉक्टर रुग्णाला मूळव्याधीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.मूळव्याधीची शस्त्रक्रिया या शस्त्रक्रियेमध्ये मूळव्याध काढली जाते. यासाठी संपूर्ण किंवा कमरेखालच्या भागाला भूल दिली जाते. पारंपरिक शस्त्रक्रियेत गुदद्वार हळुवारपणे उघडले जाते आणि मूळव्याधीचा कोंब कापून काढला जातो. एक आठवड्यात रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. पुन्हा मूळव्याधीचा त्रास उद्भवण्याची शक्यता ५ % असते. शस्त्रक्रियेविना केलेल्या उपचारांमध्ये ही शक्यता जास्त असते. पुन्हा त्रास उद्भवू नये म्हणून आहारात केलेले बदल तसेच चालू ठेवणे फायद्याचे ठरते (उदा: तंतुमय पदार्थ जास्त खाणे). Transanal haemorrhoidal dearterialisation (THD) or haemorrhoidal artery ligation (HALO) – या शस्त्रक्रियेमध्ये मूळव्याधीचा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. यासाठी संपूर्ण भूल दिली जाते. या प्रक्रियेमध्ये Doppler ultrasound probe जोडलेले एक छोटे उपकरण गुदद्वारातून आत सारले जाते. यामुळे मूळव्याधीचा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या शोधायला मदत होते.

Stapler Haemorrhoidectomy:

ही शस्त्रक्रिया पारंपरिक शस्त्रक्रियेला पर्याय म्हणून वापरली जाते. ही शस्त्रक्रिया संपूर्ण भूल देऊन केली जाते. गुदद्वाराबाहेर लटकणाऱ्या मूळव्याधीच्या कोंबांसाठी देखील ही शस्त्रक्रिया करतात. बऱ्याच रुग्णांना या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा दुसरा मूळव्याधीचा कोंब बाहेर लटकण्याचा त्रास होऊ शकतो. पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये हे प्रमाण कमी दिसते. इतर उपचारपद्धतींपेक्षा या शस्त्रक्रियेत गुंतागुंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही उपचार पद्धत पूर्वी पेक्षा कमी प्रचलित आहे. काही वेळा स्त्रियांमध्ये गुदाशय व योनीमार्ग( fistula to vagina ) जोडले जाणे किंवा गुदाशयाला भोक(rectal perforation) पडणे यासारखी गंभीर गुंतागुंत झालेली देखील दिसून येते.

मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेतील धोके(Risks of Piles Surgery in marathi):

  • मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेनंतर गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता खूप कमी असली तरी काही धोके संभवू शकतात –
  • रक्तस्त्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या पडणे
  • जंतुसंसर्ग व त्यामुळे पू किंवा गळू तयार होऊ शकतो.
  • लघवी तुंबणे (लघवी पूर्ण साफ न होणे)
  • शौचावर ताबा न राहणे
  • गुदद्वारापासून त्वचेपर्यंत अनैसर्गिक मार्ग तयार होणे
  • गुदद्वार अरुंद होणे
  • मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च  हा बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो-
  • खोलीचा प्रकार ( general ward, Private room, semi -private room)
  • शस्त्रक्रियेचा प्रकार (पारंपरिक शस्त्रक्रिया / Stapler haemorroidectomy)
  • हॉस्पिटलची निवड इ.

रुग्णाला आधी असणारे आजार उदा. मधुमेह, हृदयविकार यासारख्या वैद्यकीय परिस्थितीत गंभीर देखरेख आवश्यक असल्यास हॉस्पिटल मध्ये राहण्याचा कालावधी व पर्यायाने खर्च वाढू शकतो.

डॉक्टरांबरोबर आपली प्रथम भेट झाल्यानंतर आपल्याला खर्चाचा साधारण अंदाज मिळू शकतो.

फिशर / गुदद्वाराजवळ जखम होणे(Ulceration near the fissure/anus)

फिशर म्हणजे काय(What is a fissure)?

फिशर म्हणजे गुदद्वाराच्या खालच्या बाजूला त्वचेजवळ जखम भेग पडणे. कठीण शौच असेल तर गुदाशयाच्या आतील नाजूक आवरणावर दाब पडून किंवा पातळ शौचाच्या वेळी जोर केल्यामुळे फिशर होते.

फिशरची लक्षणे कोणती आहेत(What are the symptoms of Fisher)?

वेदना: रुग्णाला शौचाच्या वेळी व शौचानंतर वेदना होऊ शकतात. फिशरच्या वेदना अतिशय तीव्र असतात. या वेदना काही मिनिटे ते काही तास असू शकतात. गुदद्वाराच्या भोवती गोलाकार असलेले स्नायू आकुंचन पावल्यामुळे या वेदना होत असतात. या वेदना इतक्या तीव्र असतात की रुग्णाच्या शौचाला जाण्याची भीती वाटते आणि त्यामुळे बरेच रुग्ण शौचाला जाण्याचे टाळतात. परंतु यामुळे constipution होऊन शौच कठीण होते व आणखी वेदना होतात.

रक्तस्त्राव: शौचाच्या वेळी त्या जखमेतून रक्तस्त्राव होतो.

काही वेळा फिशरजवळ किंवा त्याभोवती सूज येऊन अतिरिक्त त्वचा तयार होते व लटकू लागते. बरेचदा यातून चिकट स्त्राव येतो आणि त्यामुळे त्वचा खरचटल्यासारखी होते व खाजते.

शस्त्रक्रियेविना उपचार(Non-surgical treatment in marathi):

आहारात Fiber पदार्थांचा समावेश केल्याने शौच सुलभ होण्यास मदत होते.

रोज भरपूर पाणी पिणे. सुमारे २ ते २.५ लि. पाणी पिणे आवश्यक आहे.

औषधे: शौच करण्या आधी व नंतर शौचाची जागा तात्पुरती बधिर करणारी मलमे लावल्यामुळे शौचाच्या वेळी वेदना होत नाही. गुदद्वाराभोवतीच्या स्नायूंचे आकुंचन कमी

करण्यासाठी तसेच सूज कमी करण्यासाठी आपले डॉक्टर ही मलमे लावण्यास सांगू शकतात.

डॉ. अभिजित बी. गोटखिंडे हे हडपसर, पुणे येथील नामवंत डॉक्टर आणि सर्वोत्तम लेसर सर्जन आहेत. अल्ट्रा केअर क्लिनिकमध्ये विविध आजार जसे मूळव्याध, फिशर, फिस्टुला, हर्निया आणि त्याचे प्रकार यावर आधुनिक उपचार मिळतात. डॉ. अभिजित बी. गोटखिंडे यांनी MBBS, DNB (GEN SURGERY), FMAS,FIAGES, Fellow in Adv lap. शिक्षण पूर्ण केले. त्यांना जीआय आणि कोलोरेक्टल शस्त्रक्रियांचा व्यापक अनुभव आहे. अल्ट्रा केअर क्लिनिकमध्ये या आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तसेच वाजवी दरात उपचार केले जातात. आजवर अनेक रुग्णांना याचा फायदा झाला आहे. कोणतीही तडजोड न करता वाजवी दरात दर्जेदार सेवा देणारे पुण्यातले तज्ञ सर्जन डॉ. अभिजित गोटखिंडे यांचे नाव प्रसिद्ध आहे.