हर्निया म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार समजून घ्या.

हर्निया(hernia) या आजारामुळे अनेकजण त्रस्त आहेत. हर्नियाचा त्रास कॅन्सरलाही निमंत्रण देऊ शकतो. आज समजून घेऊयात हर्निया(hernia) म्हणजे काय ? त्याची कारणे, लक्षणे व योग्य उपचार काय आहेत या विषयी जाणून घेऊयात.
हर्निया म्हणजे काय ?
आपल्या शरीरात प्रत्येक अवयवाची एक जागा व हद्द ठरलेली असते. शरीरातील स्नायू कमजोर झाल्यामुळे त्या मधील मांसपेशी स्नायुमधून बाहेर येतात याला हर्निया(hernia)म्हणतात.
हा कोणत्याही वयोगटातील स्री पुरुषांना होवू शकतो. पोट,नाभी,जांघ किवा कंबर या मध्ये हर्निया होवू शकतो . पण पोटाच्या हर्नियाचे प्रमाण जास्त आहे. पोटातील आतडे हे पोटातील स्नायूच्या मध्ये असतात. पोटाचे स्नायू कमजोर झाल्यामुळे आतडे या स्नायूच्या छिद्रा मधून बाहेर येते.

कारणे :(Causes Of Hernia)

१ बद्धकोष्ठता
२ दीर्घकाळ असलेला खोकला
३ सतत अवजड वस्तू उचलणे
४ पोटाचे ऑपरेशन
५ अती प्रमाणात मद्यपान व धूम्रपान
६ वाढलेले वजन

लक्षणे:( Symptoms Of Hernia)

१ ओटीपोट दुखणे
२ ओटीपोटात सूज येते व वेदना तीव्र होतात
३ लघवी करण्यास अडचण येणे
४ उलटी होणे
५ बेंबी ,मांडी गुदाद्वाराजवळ वेदनादायी फुगवटा जाणवणे

हर्नियाचे प्रकार-( Types Of Hernia)

१ स्पोर्ट्स हर्निया – ओटीपोट व मांडीच्या दरम्यान गाठ असते
२ नाभीसंबधी हर्निया – ६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये शक्यता जास्त .
३ एन्सिजनल हर्निया – पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर होवू शकतो
४ हाइटल हर्निया – ओटीपोटात असलेल्या मोठ्या आतड्याद्वारे छातीपर्यंत पोहोचतो .

हर्नियावरील उपचार 🙁 Treatment Of Hernia)

हर्नियाच्या सर्व प्रकारांवर ultra care क्लीनिकमध्ये उपचार केले जातात.
शस्त्रक्रिया(ऑपरेशन).
१ खुल्या पद्धतीने शस्त्रक्रिया(Surgery) करून स्नायुमधून बाहेर आलेले आतडे पूर्ववत करून अथवा कापून त्यांना जैविक जाळीचा आधार देतात व कमजोर स्नायू शिवून बळकट केले जातात.
लेपरोस्कॉपिक(laparoscopic) पद्धतीने सूक्ष्म छेद करून ऑपरेशन करतात हे खूप प्रगत तंत्रज्ञान वापरुन केले जाते. त्यामुळे वेळ कमी लागतो व रिकव्हरी जलद होते.
लेप्रोस्कोपिक प्रक्रियेदरम्यान रुग्णांना कमीतकमी वेदना होतात. शस्त्रक्रियेदरम्यान भूल दिल्याने वेदना जाणवणार नाहीत. शस्त्रक्रियेनंतर(Surgery), थोड्या काळासाठी कमीतकमी वेदना होऊ शकतात. रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर(Surgery) सुमारे 15-20 दिवसांपर्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यानंतरही, रुग्णाने ओटीपोटात किंवा ओटीपोटाच्या आसपास जास्त ताण देऊ नये.
ऑपरेशन नंतर २-३ आठवडे खोकला होऊ नये याची काळजी घ्यावी.तसेच ४-६ महिने खूप अवजड वस्तू उचलू नये.मद्यपान व धूम्रपान पूर्ण बंद करणे हितकारक आहे .
हर्नियाचे निदान झाल्यावर योग्य उपचारांनी आजारातून पूर्ण मुक्तता मिळू शकते.

डॉ. अभिजीत बी. गोटखिंडे पुणे के हडपसर में एक प्रसिद्ध डॉक्टर और सर्वश्रेष्ठ लेजर सर्जन हैं। अल्ट्रा केयर क्लिनिक विभिन्न बीमारियों जैसे बवासीर, फिशर, फिस्टुला, हर्निया(hernia) और उनके प्रकारों के लिए आधुनिक उपचार प्रदान करता है। डॉ. अभिजीत बी. गोटखिंडे ने एमबीबीएस, डीएनबी (जनरल सर्जरी), एफएमएएस, FMAS,FIAGES, Fellow in Adv lap. की शिक्षा पूरी की है। उन्हें जीआई और कोलोरेक्टल सर्जरी में व्यापक अनुभव है। अल्ट्रा केयर क्लीनिक इन बीमारियों का इलाज अत्याधुनिक तकनीक के साथ-साथ उचित दरों पर करते हैं। इससे अब तक कई मरीज लाभान्वित हो चुके हैं। पुणे का एक विशेषज्ञ सर्जन अभिजीत गोटखिंडे ,जो अपने क्लीनिक मे बिना किसी समझौता के उचित दरों पर गुणवत्तापूर्ण सेवाएं प्रदान करता