मानवी शरीर हे अनेक लहान-मोठ्या पेशींनी बनलेलं आहे.म्हणूनच मानवी शरीराला जटील किंवा complicated असं सुद्धा म्हणू शकतो.आपल्या शरीरात अपेंडिक्स हा एक अवयव असतो.हा अवयव सर्वच व्यक्तींना असतो.मानवी शरीराची पूर्ण वाढ झाल्यावर अपेंडिक्सची वाढ होत नाही.या लेखात आपण पाहूया, अपेंडिक्स म्हणजे काय?,त्याची कारणे,लक्षणे,निदान,उपचार आणि काळजी.

अपेंडिक्स म्हणजे काय?

लहान आतडे संपून जिथे मोठे आतडे चालू होते तिथे शेपटीसारखा बाहेर आलेला एक भाग मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला असतो.त्यालाच “अपेंडिक्स” असे म्हणतात.
अपेंडिक्सचा आकार तुतीसारखा असतो. अपेंडिक्स हे आपल्या शरीराच्या खालच्या उजव्या बाजूला असते. परंतु, संसर्गामुळे अपेंडिक्सला सूज येते आणि पु होतो. तेव्हा “अपेंडिसाइटिस” होतो. अपेंडिक्स हा शरीरासाठी निरुपयोगी अवयव असून त्याचा काही उपयोग नाही, असे पूर्वीच्या डॉक्टरांचे मत होते. पण नंतरच्या संशोधनात असे आढळून आले की अपेंडिक्स हा देखील निरोगी शरीरासाठी एक आवश्यक अवयव आहे. यामध्ये पचनसंस्थेसाठी चांगले बॅक्टेरिया साठवले जातात, जे पचनास मदत करतात. जेव्हा दीर्घ आजारामुळे आपल्या शरीरात बॅक्टेरियाची कमतरता असते, तेव्हा अपेंडिक्सचे काम पचनसंस्था सुरळीत ठेवणे हे असते.

अपेंडिक्स होण्याची कारणे:

१)अपेंडिक्समध्ये आतड्यातील अन्न किंवा मलाचे कण जाऊन अडकल्यास इन्फेक्शन होऊन अपेंडिक्सला सूज येते व वेदना सुरु होतात.
२) पोटा साफ न होण्याच्या सवयीमुळे.
३)पोटात जंत झाल्यामुळे.
४)अपेंडिक्सला पीळ पडल्यामुळे.
५)अयोग्य आहाराच्या सवयीमुळे.
६)आहारातील तंतुमय पदार्थांच्या अभावामुळे.

अपेंडिक्स होण्याची लक्षणे:

१)भूक न लागणे.
२)खालच्या उजव्या ओटीपोटात दुखणे.
३)वरच्या ओटीपोटात किंवा पोटाच्या बेंबीभोवती वेदना होणे.
४) पचनक्रिया नीट न होणे.
५)बारीक ताप येणे.
६)डोकं दुखणे.
७)उलटी होणे.
८)पोट फुगणे.
९)पोट साफ न होणे.
१०)मळमळ, उलट्या, अतिसार, बद्धकोष्ठता.
११)ओटीपोटात सूज येणे.
१२)गॅस पास करण्यात अडचण.

अपेंडिक्सवर उपचार:

बहुतेक वेळेस पोट दुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. कमी प्रमाणात पोट दुखत असल्यास डॉक्टर वेदनाशामक औषधे देऊन तात्पुरता इलाज करतात. मात्र वेदना अधिक प्रमाणात होत असल्यास आतड्यांची सोनोग्राफी करून योग्य निदान केले जाते.
याशिवाय रुग्णाची लक्षणे व शारीरिक तपासणी करून डॉक्टरांद्वारे निदान निश्चित केले जाते. याच्या जोडीला ब्लड टेस्ट, एक्स-रे, सिटीस्कॅन किंवा MRI स्कॅन सुद्धा गरजेनुसार केले जाते.
अपेंडिक्स जास्त सुजल्यास किंवा जास्त वेदना होत असल्यास अपेंडिक्स फुटून पोटाच्या आतील भागात इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्यास डॉक्टर तातडीने ऑपरेशन करून इन्फेक्टेड अपेंडिक्सचा भाग काढून टाकतात.

ऑपरेशन प्रक्रिया:

१) पोटाला चीर देऊन
२) लॅप्रोस्कोपी तंत्राच्या साह्याने

पोटाची कोणतीही दुखणी घरगुती उपायांनी बरी न झाल्यास त्वरित इलाज करून घेणे योग्य ठरते म्हणून वरीलपैकी काही लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अल्ट्रा केअर क्लिनिक:

डॉ. अभिजित बी. गोटखिंडे हे हडपसर, पुणे येथील वंत डॉक्टर  आणि सर्वोत्तम लेसर सर्जन आहेत. अल्ट्रा केअर क्लिनिकमध्ये  विविध आजार जसे मूळव्याध, फिशर, फिस्टुला, हर्निया आणि त्याचे प्रकार   यावर आधुनिक उपचार मिळतात. डॉ. अभिजित बी. गोटखिंडे यांनी MBBS, DNB (GEN SURGERY), FMAS,FIAGES, Fellow in Adv lap. शिक्षण पूर्ण केले. त्यांना जीआय आणि कोलोरेक्टल शस्त्रक्रियांचा व्यापक अनुभव आहे. अल्ट्रा केअर क्लिनिकमध्ये  या आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तसेच वाजवी दरात उपचार केले जातात. आजवर अनेक रुग्णांना याचा फायदा झाला आहे. कोणतीही तडजोड न करता वाजवी दरात दर्जेदार सेवा देणारे पुण्यातले तज्ञ सर्जन डॉ. अभिजित गोटखिंडे यांचे नाव प्रसिद्ध आहे.