हर्निया आपल्या आजूबाजूला कुणाला तरी झाला आहे असे आपण बरेचदा ऐकतो. पण हर्निया झाला म्हणजे नक्की काय झाले हे आपल्याला माहिती नसते. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाल्यास हर्निया म्हणजे एखादा अवयव किंवा त्याचा भाग नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांमधून बाहेर येणे. हर्निया हे पोटांशी संबंधित असतात. पोटाच्या खालच्या भागात, जांघेत    (७५%), मांडीच्या अगदी वरच्या भागात ( १५%), आणि (बेंबीत ८ %)  क्वचित फुप्फुस(lungs), मेंदू(brain), स्नायू(muscles) किंवा चरबी यांचा हर्निया ही होऊ शकतो.

हर्निया होण्याची काही कारणे(Causes of Hernia):

 • जेव्हा एखाद्या व्यक्तीचे पोटाचे स्नायू हे अशक्त असतात तेव्हा हर्निया होऊ शकतो.
 •  एखाद्या व्यक्तीस दीर्घ काळा पर्यंत खोकला असेल त्या व्यक्तीस हर्निया होऊ शकतो.
 •  ६० पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये हर्निया होण्याची शक्यता जास्त असते कारण या वयात स्नायू कमजोर झालेले असतात.
 •  एखाद्यास मूत्रपिंड(kidney) वा यकृत(Liver) संबंधी आजार असतील तर त्या व्यक्तीस हर्निया होण्याची शक्यता असते.
 • बद्धकोष्ठता(Constipation) असणाऱ्या व्यक्तींना शौचासाठी जोर लावावा लागत असल्या कारणाने त्यांना ही हर्निया होण्याची शक्यता असते .

हर्नियावर शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव उपाय आहे. शस्त्रक्रियेनंतर कुठलीही गुंतागुत होऊ नये आणि अशक्त स्नायूंना भरून येण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास हर्नियाचा त्रास परत होण्याचे प्रमाण खूप कमी आहे.

हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर खालील खबरदारी घ्यावी लागते –

या शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या जखमांची काळजी घ्यावी आणि त्या वेळोवेळी स्वच्छ ठेवाव्या जेणे करून त्यांचा शरीरात संसर्ग होणार नाही.

 •  ऑपरेशन नंतर जोरात खोकणे, शिंकणे टाळावे.
 •  शौच आणि लघवी साठी जोर करू नये.
 • शक्यतो खाली बसणे टाळावे. तसेच खाली जास्त वाकू नये.
 •  धूम्रपान करणे कटाक्षाने टाळावे.
 •  फायबर ने समृद्ध असलेला आहार घ्यावा.
 •  १० – १२ दिवस चांगली विश्रांती घ्यावी.
 •  जिण्याचा वापर टाळावा.
 •  ऑपरेशन नंतर किमान दोन महिने जड वस्तू उचलणे, स्कूटर ला किक मारणे, उंचावरून उडी मारणे, जिम ला जाणे कटाक्षाने टाळावे.
 •  अती व्यायाम करणे टाळावे.
 •  पिण्याचे पाणी शक्यतो उकळून प्यावे.
 •  आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे.

वरील खबरदारी घेतल्यास हर्नियाची समस्या आपण यशस्वी रित्या हाताळू शकतो. वरील कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा.

Ultra Care Clinic

Dr. Abhijit Gotkhinde हे शस्त्रक्रियेनंतरही हर्नियावर उत्तम उपचार देतात. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनांवर बरा होण्यासाठी तो सर्वोत्तम घरगुती उपाय सुचवतो. तुम्हाला अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना होत असल्यास,

संपर्क करा : Ultra Care Clinic, Dr. Abhijit Gotkhinde, Pune.