पित्त हा शब्द ‘तप’ ह्या शब्दा पासून तयार झाला आहे. तप म्हणजे उष्णता, धग. पित्ता मध्ये उष्णता आणि जल ह्या दोन्ही तत्वांचा समावेश आहे.“आरोग्यं धन संपदा” असे आपण नेहमी म्हणतो. परंतु हल्लीची बदलती धकाधकीची जीवन शैली, ऋतुमानात होणारे वारंवार बदल, चुकीच्या पद्धतीच्या आहार सवयी, व्यायामाचा अभाव,रात्रीचे जागरण,अपुरी झोप,जंक फुड ह्या सगळ्यामुळे आरोग्य ही संपदा नसून रोगाचे आगर झाले आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या शरीरात एखादा बिघाड होतो त्यावेळी त्याची लक्षणे आपल्याला दिसू लागतात.

आपल्या शरीरातील पित्ताशय हे आपल्या शरीरात महत्वाचे कार्य करते. पित्ताशय हा यकृताच्या मागे व खालच्या बाजूला असलेला एक छोट्या पिशवीसारखा अवयव आहे. आणि पित्ताशयाचे कार्य म्हणजे पित्त साठवणे व त्याचा निचरा करणे आहे. त्यामुळे आहारातील चरबीचे पचन होण्यास मदत होते. पित्तामध्ये कोलेस्ट्रोल तसेच इतर अनेक रासायनिक द्रव्ये असतात. आणि या सर्वामध्ये असमतोल निर्माण झाल्यास पित्ताशयात खडे(Gallstone) तयार होतात.बहुतांशी पित्तामधील कोलेस्ट्रोलची पातळी खूप वाढते, आणि या अतिरिक्त कोलेस्ट्रोलचे खडे तयार होतात. जेव्हा आपण तेलकट मसालेदार पदार्थ खातो तेव्हा हे ह्या पित्ताशयात असणारे घट्ट पित्त त्याचे पचन करायला मदत करते.

आता आपण बघूया जेव्हा या पित्ताशयाचे कार्य अनियंत्रित होते तेव्हा कोणते आजार उदभवतात

  1. पित्ताशयाला सूज येणे. पित्ताशयामध्ये होत असणारे आकुंचन जेव्हा होईनासे होते तेव्हा पित्ताशयाला सूज येते.
  2. पित्ताशयात कोलेस्ट्रोलची पातळी वाढली की या अतिरिक्त कोलेस्ट्रोलचे खडे तयार होतात. प्रमाणापेक्षा जास्त वजन असलेल्या स्त्रियांमध्ये पित्ताशयात खडे होण्याचा त्रास पुरुषांपेक्षा २ ते ३ पटींनी जास्त असतो. ४० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या स्त्रियांमध्ये मुले झाल्यानंतर गर्भावस्थेमध्ये स्त्रियांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये अनेक बदल घडून येतात. या बदलांमुळे कोलेस्ट्रोलची पातळी वाढते. त्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो.

पित्ताशयात त्रास होतो म्हणजे नक्की काय होते?

पोटात तीव्र वेदना होणे. या वेदना पोटातून उजव्या खांद्याकडे किंवा पाठीकडे जातात. जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर विशेषतः तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर ही वेदना वाढते. पोटात टोचल्या सारखे किंवा कळ येऊन दुखते. छातीत दुखते, छातीत जळजळ होते, पोटात अपचन होऊन वात धरतो. पोट सतत फुगल्यासारखे वाटते. मळमळ,उलट्या, ताप येतो. पोटाच्या उजव्या भागाला हात लावल्यावर दुखते. शौचाचा रंग फिका किंवा मातकट दिसतो.

यावर उपाय म्हणजे वजन आटोक्यात ठेवणे हा पित्ताशयावरील त्रासावर उत्तम उपाय आहे. परंतु हेच वजन जलद गतीने न करता सावकाश केल्यास त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. योग्य आहार, नियंत्रित सवयी, रोजचा व्यायाम आणि त्याच बरोबर आपल्याला योग्य अशा मार्गदर्शनासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.तर आणि तरच आपले आरोग्य ही संपदा व्हायला वेळ लागणार नाही.

अल्ट्रा केअर क्लिनिक:

डॉ. अभिजित बी. गोटखिंडे हे हडपसर, पुणे येथील वंत डॉक्टर  आणि सर्वोत्तम लेसर सर्जन आहेत. अल्ट्रा केअर क्लिनिकमध्ये  विविध आजार जसे मूळव्याध, फिशर, फिस्टुला, हर्निया आणि त्याचे प्रकार   यावर आधुनिक उपचार मिळतात. डॉ. अभिजित बी. गोटखिंडे यांनी MBBS, DNB (GEN SURGERY), FMAS,FIAGES, Fellow in Adv lap. शिक्षण पूर्ण केले. त्यांना जीआय आणि कोलोरेक्टल शस्त्रक्रियांचा व्यापक अनुभव आहे. अल्ट्रा केअर क्लिनिकमध्ये  या आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तसेच वाजवी दरात उपचार केले जातात. आजवर अनेक रुग्णांना याचा फायदा झाला आहे. कोणतीही तडजोड न करता वाजवी दरात दर्जेदार सेवा देणारे पुण्यातले तज्ञ सर्जन डॉ. अभिजित गोटखिंडे यांचे नाव प्रसिद्ध आहे.