मूळव्याध होण्याची कारणे | मूळव्याधीची मुख्य लक्षण-Causes of Hemorrhoids | The main symptoms of hemorrhoids In Marathi-

मूळव्याध(Hemorrhoids) हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. या आजारामध्ये गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील रक्तवाहिन्या फुगतात व सुजतात . यामध्ये कधी रक्तस्त्राव होतो तर कधी कधी होतही नाही. जेव्हा गुदद्वाराच्या सभोवताल आतमधील रक्तवाहिन्या( बाहेर येतात तेव्हा सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव आणि काटा टोचत आहे असे वाटते. अधिक रक्तस्राव झाल्यास ॲनिमिया सुद्धा होऊ शकतो गुदद्वाराची आकुंचन क्षमता नष्ट होत जाते. अनेक लोक पाईल्सच्या त्रासाने त्रस्त आहेत. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते.

आज आपण मूळव्याधाची(Hemorrhoids) कारणे, लक्षणे व उपाय यांची सविस्तर माहिती घेऊया.

कारणे:-Causes of Hemorrhoids In Marathi

१)आहार-आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे किंवा कोरडे आणि शिळे अन्न खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो किंवा कुंथावे लागते. अशावेळी मूळव्याध(Hemorrhoids) होण्याचा धोका वाढतो.
२)गर्भावस्था- बहुतेक स्त्रियांना गर्भावस्थेत तिसऱ्या महिन्यापासूनच मूळव्याधीचा(Hemorrhoids) त्रास होतो.
३) वाढते वय – जसे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीराचे स्नायू, रक्तवाहिन्या व आधार देणारे इतर अनेक घटक कमकुवत होत जातात आणि
मूळव्याध(Hemorrhoids) होण्याचा धोका वाढत जातो.
४)वाढलेले वजन – बऱ्याच वेळा शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे स्थूलपणा येतो आणि गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब येतो.
५)अनुवांशिकता – कधी कधी हा आजार अनुवंशिक ही असू शकतो.
६)शौचाला जाण्यास टाळाटाळ – शौचाला अडवून ठेवल्यामुळे गुदद्वारावर अधिक ताण येतो त्यामुळे मुळव्याधीचा(Hemorrhoids) धोका वाढतो.
७)बैठी जीवनशैली – एखाद्या कठीण जागी बराच वेळ बसून काम केल्यामुळे मूळव्याधीचा त्रास होतो
८) जड वस्तू उचलणे- सतत जड वस्तू उचलल्यामुळे गुरुद्वारातील वाहिन्या फुगतात व मुळव्याधाचा(Hemorrhoids) त्रास सुरू होतो
९) सतत खोकला , वारंवार उलट्या किंवा जुलाब यामुळे गुदद्वारावर अतिरिक्त ताण येतो
१०) अति मांसाहार किंवा अति उपवास केल्याने मूळव्याधीचा धोका उद्भवतो.

लक्षणे:-symptoms of hemorrhoids In Marathi

१) शौचानंतर रक्तस्त्राव होणे . हे रक्त लालभडक रंगाचे असते.
२) गुदद्वाराजवळ खाज येणे हे मूळव्याधीतील एक प्रमुख लक्षण आहे. हा त्रास कमी न झाल्यास त्वचेवर इंफेक्शन पसरण्याची शक्यता असते.
३) गुदद्वारामधून बाहेर आलेला कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो.
४)शौचाला आल्यानंतर आग, जळजळ आणि वेदना होणे.
४)शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे
५)गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूज येणे

मुळव्याध(Hemorrhoids) असणाऱ्या रुग्णांनी या आजारासंबंधी योग्य व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत. योग्य सूचनांचे पालन व योग्य आहार घेतला तर हा आजार खात्रीशीर बरा होतो. आणि पुन्हा मुळव्याध होण्याची शक्यताही नसते . निरोगी व्याधीमुक्त शरीर हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

 

डॉ. अभिजित बी. गोटखिंडे हे हडपसर, पुणे येथील नामवंत डॉक्टर आणि सर्वोत्तम लेसर सर्जन आहेत. अल्ट्रा केअर क्लिनिकमध्ये विविध आजार जसे मूळव्याध, फिशर, फिस्टुला, हर्निया आणि त्याचे प्रकार यावर आधुनिक उपचार मिळतात. डॉ. अभिजित बी. गोटखिंडे यांनी MBBS, DNB (GEN SURGERY), FMAS,FIAGES, Fellow in Adv lap. शिक्षण पूर्ण केले. त्यांना जीआय आणि कोलोरेक्टल शस्त्रक्रियांचा व्यापक अनुभव आहे. अल्ट्रा केअर क्लिनिकमध्ये या आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तसेच वाजवी दरात उपचार केले जातात. आजवर अनेक रुग्णांना याचा फायदा झाला आहे. कोणतीही तडजोड न करता वाजवी दरात दर्जेदार सेवा देणारे पुण्यातले तज्ञ सर्जन डॉ. अभिजित गोटखिंडे यांचे नाव प्रसिद्ध आहे.